भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आज 31 ऑक्टोबर...आज लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. म्हणूनच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ ओक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. #india#ironman#SardarVallabhbhaiPatel#StatueOfUnity